वीजजोडणीसाठी आता ‘कनेक्‍शन ऑन कॉल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

‘महावितरण’ची सेवा; नवीन ग्राहकांसाठी सुविधा
जळगाव - घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी घ्यायची असल्यास, आता ‘महावितरण’च्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्‍यकता नाही. कारण अशा ग्राहकांसाठी ‘महावितरण’कडून ‘कनेक्‍शन ऑन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना अगदी घरबसल्या कनेक्‍शन घेता येणार आहे.

‘महावितरण’ची सेवा; नवीन ग्राहकांसाठी सुविधा
जळगाव - घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी घ्यायची असल्यास, आता ‘महावितरण’च्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्‍यकता नाही. कारण अशा ग्राहकांसाठी ‘महावितरण’कडून ‘कनेक्‍शन ऑन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना अगदी घरबसल्या कनेक्‍शन घेता येणार आहे.

नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी; तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी. ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी ‘महावितरण’चे मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांचा याला मिळणारा प्रतिसाद बघून या विशेषकक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्याचा एक प्रयत्न ‘महावितरण’कडून करण्यात आला आहे.

घरीच भरला जाणार अर्ज
नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना आतापर्यंत ‘महावितरण’ कार्यालयात जाऊन अर्ज भरणे, कागदपत्र अपूर्ण असल्यास पुन्हा जावे लागत होते. परंतु, आता संबंधित ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षात ग्राहकाची सविस्तर माहिती घेऊन, या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा अर्ज घेऊन स्वत: ग्राहकाच्या घरी जातील व अर्ज भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचा प्रयत्न असेल.

नोंदणी करणे आवश्‍यक
‘महावितरण’कडून सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षाद्वारे तक्रारी सोडविण्यात येत आहे. मुख्य म्हणजे ‘एसएमएस’द्वारे देखील तक्रार निवारण केले जात आहे. यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे. ‘कनेक्‍शन ऑन कॉल’ या सेवेतून नवीन वीजजोडणीसाठी इच्छुक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे ०२२-२६४७८९८९ व ०२२-२६४७८८९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: jalgav news electricity connection connection on call