जळगावकरांना आता बसणार विजेचा ‘शॉक’!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

दोन दिवसांपासून भारनियमनाची अंमलबजावणी; नवरात्रोत्सवातही अंधार

जळगाव - नवरात्रोत्सव, दीपावली हे सणावारांचे उत्सव येत असतानाच शासनाने भारनियमानाचा दणका दिला आहे. शुक्रवारपासून (९ सप्टेंबर) शहरात भारनियमन करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील प्रत्येक भागात सकाळी आणि सायंकाळी चार- चार तास म्हणजे एकूण आठ तास तातडीचे भारनियमन करण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून भारनियमनाची अंमलबजावणी; नवरात्रोत्सवातही अंधार

जळगाव - नवरात्रोत्सव, दीपावली हे सणावारांचे उत्सव येत असतानाच शासनाने भारनियमानाचा दणका दिला आहे. शुक्रवारपासून (९ सप्टेंबर) शहरात भारनियमन करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील प्रत्येक भागात सकाळी आणि सायंकाळी चार- चार तास म्हणजे एकूण आठ तास तातडीचे भारनियमन करण्यात येत आहे.

विजेच्या लपंडाव अर्थात भारनियमनापासून मुक्ती मिळाल्यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता शासनाने जनतेचा तो आनंद हिरावून घेतला आहे. रात्र जागवून देवीची आराधना करण्याचा नवरात्रोत्सव आणि दिव्यांचा सण दीपोत्सवाच्या काळातच भारनियमनाचा दणका बसणार आहे. अचानक विजेची मागणी वाढल्याने तातडीचे भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाचे कोणतेही नियोजन नसते; परंतु मागणी वाढल्यास भारनियमन घेण्याचे आदेश दिले जातात.

दमट वातावरणामुळे विजेच्या मागणीत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात दमट वातावरण आहे. त्यामुळे हवेसाठी विजेच्या उपकरणांचा वापर वाढल्याने अचानकपणे विजेची मागणी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचानकपणे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील ‘एफ’ आणि ‘जी’ या दोन फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. शुक्रवारी (८ सप्टेंबर) शहरात अचानक भारनियमन करावे लागले होते. शहरातील बळिरामपेठमधील युनिटवर सकाळी सहा ते दहा आणि दुपारी पावणेचार ते सायंकाळी साडेसात या वेळेत भारनियमन करण्यात आले होते. आजही सकाळी नऊला भारनियमन करण्याचा आदेश आला होता. हेच भारनियमन पुढे सुरू ठेवण्याचा आदेश आला आहे. त्यामुळे तांबापुरा, पिंप्राळा, खेडी परिसर, समतानगर, शाहूनगर, शिवाजीनगर, तळेले कॉलनी, बळिरामपेठ परिसरातील काही भाग, निमखेडी शिवार भागात भारनियमन करण्यात आल्याचेही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हे तातडीचे भारनियमन आहे. मागणी वाढली तर यापुढेही भारनियमन करण्यात येईल. आणखी मागणी वाढली तर शहरातील इतर फिडरवरूनही इतर भागात भारनियमन करण्यात येईल.

विजेची मागणी वाढल्याने शुक्रवारी (८ सप्टेंबर) तातडीचे भारनियमन करण्याचे आदेश आले होते. ते वाढविण्यात आले असून, आणखी दोन दिवस ‘एफ’ आणि ‘जी’ फिडरवरील भागात भारनियमन होईल.

- दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, राज्य वीज वितरण, जळगाव मंडळ

Web Title: jalgav news electricity loadshading in jalgav