शाळेत जायला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव - शाळा सुरू होऊन अद्याप आठवडा उलटत नाही, तोवर शाळेजवळून मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक घटना शहरातील शिवाजीनगर भागात घडली. शहर पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा संशयित मुलीचा आतेभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवाजीनगर गेंदालाल मिल भागातील चौदावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारी तीनला तिला तिच्या आत्याच्या मुलाने शाळेजवळून फूस लावून पळवून नेले. यादरम्यान मुलीचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: jalgav news girl kidnapping