मार्गदर्शन नसल्याने ‘जीएसटी’बाबत भीती!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

‘जीएसटी’ लागू होताना... व्यावसायिकांनी ‘सीएं’कडून जाणून घेतली माहिती
जळगाव - शहरासह जिल्ह्यातील व्यावसायिकांना एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होणार आणि देशभरात एकच करप्रणाली अमलात येणार, इतकीच माहिती आहे; पण ज्या वस्तूंची आपण विक्री करीत असतो, त्यावर किती ‘जीएसटी’ असेल आणि त्याची किंमत कमी होणार की वाढणार, याबाबतची माहितीच नाही. एकंदरीत व्यावसायिकांमध्ये ‘जीएसटी’बद्दल भीतीच असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील व्यावसायिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

‘दोन नंबर’चे धंदे बंद होतील
मुदस्सर अहमद (विपणन व्यवस्थापक) - देशात एक जुलैपासून लागू होणारी ‘जीएसटी’ प्रणाली चांगली आहे; पण त्याबद्दल अद्याप मार्गदर्शन मिळाले नाही. कोणत्याही व्यावसायिकाला प्रणालीबद्दल पुरेशी माहिती नाही, तर सर्वसामान्यांना याबद्दल कुठून माहिती होणार? एक मात्र चांगले आहे, की ‘जीएसटी’मुळे ‘दोन नंबर’चे धंदे बंद होतील, तसेच ऑनलाइन आणि बाजारातील दरांमध्ये असलेला फरक दूर होणार असल्याने स्थानिक बाजारपेठेचा व्यवसाय वाढणार आहे.

व्यावसायिक अनभिज्ञच
देव शर्मा (व्यावसायिक) - ‘जीएसटी’ लागू होणार, याबद्दल माहीत झाल्यानंतर ‘सीए’कडून याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो; परंतु ‘सीएं’नाच याविषयी पूर्ण माहिती नसल्याने ‘जीएसटी’तून नेमके काय? हे स्पष्ट होऊ शकले नाही. केंद्र सरकारने देशभरात ‘जीएसटी’ लागू करण्याचे निश्‍चित केल्यानंतर अनेक शहरांमध्ये यावर मार्गदर्शन शिबिर झाले; पण जळगावात असे शिबिर झाले नसल्याने व्यावसायिक अनभिज्ञ आहेत.  

किमतीबाबत प्रश्‍नचिन्ह
गौरव अग्रवाल (व्यावसायिक) - एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होतोय; पण त्याचे कोणासाठी काय नियम असतील, याची अद्याप माहिती नाही. यामुळे व्यावसायिक अजूनतरी अनभिज्ञच आहेत. आम्ही मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतो; पण ज्याचा व्यवसाय करतोय, त्यावर किती ‘जीएसटी’ लागू होणार? त्या वस्तूच्या किमती ‘जीएसटी’ लागल्यानंतर कशा असतील? याबाबतही प्रश्‍नचिन्हच आहे. आता फक्‍त ‘जीएसटी’ लागण्याची वाट बघतोय.

शिबिरे घ्यावीत
दीपा देशपांडे (व्यावसायिक) - देशभरात एकच करप्रणाली लागू करणारा ‘जीएसटी’ चांगला मानला जात आहे; पण ही प्रणाली लागू होण्यापूर्वी याबद्दल पुरेशी माहिती मिळाली असती, तर व्यावसायिक याबाबत अज्ञानी राहिले नसते. यातील जे जाणकार आहेत, त्यांच्याजवळ पुरेशी माहिती आहे; पण लहान व्यावसायिक यापासून आजही दूरच आहेत. त्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे घेणे गरजेचे आहेत.

Web Title: jalgav news gst fear by no guidance