राज्यात तीन वर्षांत वाढली ९१ हजार हेक्‍टर सिंचनक्षमता - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव - युती शासन सत्तेवर आल्यानंतर राज्यात तीन वर्षांत ९३ प्रकल्प पूर्ण झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या झाल्या आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्पांना गती येऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्याचा लाभ सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

जळगाव - युती शासन सत्तेवर आल्यानंतर राज्यात तीन वर्षांत ९३ प्रकल्प पूर्ण झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या झाल्या आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्पांना गती येऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्याचा लाभ सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

मंत्री महाजन यांनी तीन वर्षांतील जलसंपदा विभागाच्या कामांची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की २०१४ ते २०१७ या वर्षात राज्यात एकूण ९३ प्रकल्प झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. विदर्भातील २८ प्रकल्पांचा सहभाग आहे. पुढील वर्षात १४० प्रकल्प पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाने ठरविले आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता व विभागाने आखलेल्या विविध धोरणामुळे व घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्प कामांना गती प्राप्त होऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर एवढी सिंचन क्षमता गेल्या तीन वर्षात निर्माण झाली असून त्याचा लाभ पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळत आहे. 

१७३ प्रकल्पांना ‘सुप्रमा’
राज्यात सन २०१४ पासून आतापर्यंत विविध पाटबंधारे महामंडळे अंतर्गत १८ प्रकल्पांना मंत्रिमंडळाने, तर ६६ प्रकल्पांना व्यय अग्रक्रम समितीने 
आणि ७० प्रकल्पांना नियामक मंडळाने सुधारित प्रशासकीय तसेच १५ 
खारभूमी अशा एकूण १७३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात 
आली आहे. 

ऑक्‍टोबर २०१४ अखेर राज्यातील विविध प्रकल्पांचे अनेक सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित होते. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही प्रकल्पावर खर्च करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे प्रकल्पांची कामे खोळंबली होती. ऑक्‍टोबर २०१४ पासून आजपर्यंत जलसंपदा विभागाकडून १७४ सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पावर खर्च करणे सुलभ होऊन कामांना गती प्राप्त झाली आहे. जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात एकूण सुमारे ४० लक्ष हेक्‍टर पर्यंत सिंचन झाले आहे.  या शिवाय राज्यातील दहा प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एक लाख १६ हजार ३८६ हेक्‍टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Web Title: jalgav news irrigation capacity increase in state