हागणदारीमुक्तीसाठी ‘मनपा’चा अनोखा फंडा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

शिरसोली नाका परिसरातील मोकळी जागा सुशोभित करून देणार मोफत ‘वाय-फाय’
जळगाव - शिरसोली नाक्‍याजवळील रस्त्यावर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी हा परिसर रहिवासी व महापालिकेच्या सहकार्याने सुशोभित करून तेथे सायंकाळी दोन तास मोफत इंटरनेट ‘वाय-फाय’ सुविधा देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मराठी प्रतिष्ठानतर्फे तेथे आज वृक्षरोपण करण्यात आले.

शहर हागणदारीमुक्तीसाठी महापालिकेने उघड्यावरील ५८ ठिकाणे शोधून तिथे उपाययोजना राबविल्या. त्यात शहर हागणदारीमुक्त झाल्याचे १४ मार्चला आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र, शासनाच्या समितीने केलेल्या तपासणीत शहर हागणदारीमुक्त नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. यापैकी शिरसोली नाका चौकातील गणपतीनगरातील सुरेश फूडच्या बाजूच्या रस्त्यालगतचा परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली, कर्मचारी ठेवून कारवाई केली, तसेच ‘गुड मॉनिंग’ पथकाकडून कारवाई करूनही या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे हे ठिकाण हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिका सुशोभीकरण करणार आहे. तेथे रहिवाशांना बसण्यासाठी बाक ठेवण्यात येणार असून, व्यावसायिक, तरुण- तरुणींसाठी मोफत इंटरनेट ‘वाय-फाय’ सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे तेथे रहिवासी बसू लागल्याने उघड्यावर शौचाच्या या प्रकाराला आळा बसण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

दरम्यान, मराठी प्रतिष्ठानतर्फे आज झालेल्या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, प्रतिष्ठानचे विजय वाणी, प्रमोद बऱ्हाटे, जमील देशपांडे, नगरसेविका ज्योती चव्हाण व पृथ्वीराज सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: jalgav news municipal planning for hagandari free