अनैतिक संबंधातून हत्या, की अवैध धंद्याचा ठरला बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

जळगाव - मेहरुण भागातील पिरजादे वाड्यातील अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा निर्घृणपणे  खून केल्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. घडल्या प्रकारात रात्री त्याच्या घरापासून व शहरापासून तीस किलोमीटर दूरवर घेऊन जात नावेद अख्तर या तरुणाचा खून करण्याइतपत कोणाशी शत्रुत्व असू शकते, या प्रश्‍नाने पोलिसांना बेचैन करून सोडल्याने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांचे डीबी कर्मचारी, गुन्हे शाखा सायबर सेल, फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ या गुन्ह्याच्या तपासात जुंपले आहेत. 

जळगाव - मेहरुण भागातील पिरजादे वाड्यातील अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा निर्घृणपणे  खून केल्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. घडल्या प्रकारात रात्री त्याच्या घरापासून व शहरापासून तीस किलोमीटर दूरवर घेऊन जात नावेद अख्तर या तरुणाचा खून करण्याइतपत कोणाशी शत्रुत्व असू शकते, या प्रश्‍नाने पोलिसांना बेचैन करून सोडल्याने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांचे डीबी कर्मचारी, गुन्हे शाखा सायबर सेल, फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ या गुन्ह्याच्या तपासात जुंपले आहेत. 

पिरजादे वाड्यातील रहिवासी नावेद अख्तर शकीबुद्दीन पिरजादे (वय १८) याला चार बहिणी, तीन भाऊ, आई-वडील असे मोठे कुटुंब असून कुटुंबाचा राहट गाडा ओढण्यासाठी महिला सोडून सर्वच मिळेल ते काम करून गुजराण करतात. परिस्थितीने गरीब आणि स्वभावानेही तसा मिळून मिसळून वागणारा असल्याने नावेदला कोणीही सोबत कामावर घेऊन जात असे.

वर्षभरा पूर्वी तो बी.जे.मार्केट समोर सोरट चालवणाऱ्या शकील मुलतानी याच्या सोबत ‘गुडगुडी’ या जुगाराच्या धंद्यावर मदतनीस म्हणून उभा राहत असे. तद्‌नंतर भंगार व्यावसायिक जाकीर भाईजान सोबत तो काम करीत होता, सकाळ-संध्याकाळ सोबतच येणे-जाणे होते. मात्र रमजान महिना असल्याने संध्याकाळी परतल्यावर दुसऱ्या दिवशीच एकमेकांशी संपर्क होत असे. नावेदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यावर सर्वांत आधी त्याची ओळख भंगारवाल्यांनीच पटवली. अनेक दिवस त्याने पिंटू भाऊ, कैलास राजपूत यांच्यासोबतही काम केले होते. गुन्ह्यात तपासाचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणून उपअधीक्षक सचिन सांगळे, निरीक्षक सुनील कुराडे, सचिन बागूल यांनी या मुद्यांवर लक्ष केंद्रित करीत चौकशी सुरू केली आहे. 

अनैतिक संबंध की...
नावेद अख्तर या तरुणाचे परिसरातील एका मुलीशी सूत जुळले होते. अशी चर्चाही समोर आली, त्यावर चौकशी केल्यानंतर फारसे काही आढळले नाही. त्याची वेगवेगळ्या लोकांशी ओळख होती परिसर गल्लीतील मित्रांसह बाहेरही त्याची उठबस होती. वाड्याच्या बाहेर कुणाशी संबंध होते काय.‘धार्मिक कट्टरवादी’ संघटनांशी निगडित लोकांशी संपर्कात होता. की, त्याच्याशी निगडित काही वाद आहे याचाही शोध घेतला जात असून सायबर सेल कार्यान्वित झाली आहे. 

शिरसोली रोडवर कॅमेरेबंद
जळगाव ते शिरसोली हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे, या मार्गावर जैन उद्योगाच्या प्रवेशद्वारावर कॅमेरा होता तो नादुरुस्त झाला आहे, पुढे रायसोनी महाविद्यालयाच्या कॅमेऱ्यात बाहेरचे दृष्य दिसत नाही, इतर संस्थांचे कॅमेरे बंद आहे. परिणामी आज तपास पथकातील कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामाना करावा लागला. मेहरुणच्या फातिमा मशिदीत तो शुक्रवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान दिसतोय याचे सिसीटीव्ही फुटेज पोलिसांनी संकलित केले आहे. 

पिरजादेवाड्यात बंदी
पिरजादे समुदाय पर्दा पद्धतीचा अवलंब करीत असल्याने, येथे कुटुंबातील पुरुषांशीही महिला पर्दा करताना दिसतात. मेहरुण परिसरात पिरजादे समुदाय सलग दोनतीन गल्ल्या असून या ठिकाणी इतर कुठलाही अनोळखी शिरला तर त्याची चौकशी होते. का आला, कुणाकडे आला, असे हटकले जाते परिणामी नावेद अख्तर या तरुणाला पिरजादेवाड्यातून नेणे अशक्‍य असल्याने मारेकऱ्यांनी बाहेरूनच त्याला उचलून नेल्याची शक्‍यता आहे.

‘शाहरुख’ मर्डरच्या आठवणी..!
शहरातील अशोक टॉकीजशेजारील शाहरुख पटेल या अठरावर्षीय तरुणाचा डिसेंबर २०१३ मध्ये मेहरुण शिवारात गळा चिरून निर्घृण खून झाला होता. तशाच पद्धतीने नावेद अख्तर या तरुणाला रात्री सोबत नेत शिरसोली गावाजवळ आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे बाभळीच्या जंगलात हत्या करण्यात आली. नावेदचा गळ्यावर बारीक वायरने गळा दाबण्याचे, हत्याराने कापण्याचा प्रयत्न केल्याच्या खून असून गळ्यात तीक्ष्ण हत्यार खुपसून करण्यात आला आहे. शवविच्छेदन करण्यापूर्वी डॉ. मिलिंद बारी यांना त्या खून प्रकरणाची आठवण झाल्याने, त्या प्रकरणाच्या आठवणींना उजाळा मिळाला. पोलिस अधिकाऱ्यांनीही माहिती जाणून घेतली.

Web Title: jalgav news murder