जळगाव जिल्ह्यातील नऊ खून तपासाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जळगाव - जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. जिल्ह्यात आजमितीस आठ खुनाचे गुन्हे तपासाविना प्रलंबित असून, काल नवव्या खुनाची त्यात भर पडली. भादली, चाळीसगावनंतर जळगाव शहरात आणि तेही पोलिस अधीक्षक कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीने बांधकाम ठेकेदाराचा खून करून पोबारा केल्याच्या घटनेस चोवीस तास उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही. तसेच कोणत्या कारणासाठी खून झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मार्चमध्ये चाळीसगाव शहरात दरोडा आणि खुनाचा गुन्हा घडला. या घटनेला दहा-बारा दिवस उलटत नाही तोवर भादली (ता. जळगाव) येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. तत्पूर्वी, भुसावळ उपविभागात एक खून अन्‌डिटेक्‍ट आहेच. शिवाय, शहरातील बी. जे. मार्केटमधील शौचालयात एस.एस.बी.टी. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या हत्येचा अद्याप तपास लागलेला नाही. अशा आठ गुन्ह्यांचा तपास आणि त्यांचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नसताना काल (३ जून) महात्मा गांधी उद्यानात श्रावण भगीरथ राठोड (वय ४५) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली. 

पोलिसांचे नशीब साथ देईना!
पोलिस अधीक्षकपदावर डॉ. जालिंदर सुपेकर असताना मागील काही वर्षांत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. त्यांच्या बदलीनंतर पोलिस अधीक्षकपदी दत्तात्रय कराळे, अप्पर अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदभार घेतला. चाळीसगावचा पदभार जिल्ह्यात कारकीर्द गाजवलेले प्रशांत बच्छाव यांच्याकडे आहे, तर भुसावळचा पदभार सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल सांभाळत आहेत. जळगावात उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन सांगळे कार्यरत आहेत. गुन्हे शाखेची धुरा राजेशसिंह चंदेल यांच्याकडे आहे. जिल्ह्यात कार्यतत्परता असलेल्या अधिकाऱ्यांच्या या फौजचे प्रयत्न तोकडे पडत असून, नशिबही साथ देईना, अशी पोलिस दलाची अवस्था झाली आहे.

Web Title: jalgav news nine murder in inquiry waiting