पावसाचे सुखद आगमन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पहाटेपासून रिपरिप सुरूच; जळगावकरांत समाधान

जळगाव - आठवडाभरापासून गायब झालेल्या पावसाचे आज आगमन झाले. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पिकांना जीवदान देणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखद आहे. जिल्ह्यातील काही भागांत चांगला पाऊस झाला असून, शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या.

मॉन्सून सुरू होऊन महिना उलटला. यानंतरही जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. महिनाभरापूर्वी पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती; परंतु वीस दिवस पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ठाकले होते. गेल्या आठवड्यात पाऊस झाला. आता चांगला पाऊस होणार, असा अंदाज बांधला जात होता. यानंतर उर्वरित पेरणीची कामेही शेतकऱ्यांनी करून घेतली; परंतु दोन दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा दडी मारली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शहरात रिपरिप सुरूच
जिल्ह्यात बुधवारपासून (१२ जुलै) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्यानंतर आज पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. सकाळी साडेसहा- सातपर्यंत पाऊस सुरूच होता. यानंतर आकाश निरभ्र होऊन ऊनही पडले होते. यामुळे पाऊस पुन्हा हुलकावणी देणार असल्याचे वाटत असताना, दुपारी आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाला सुरवात झाली. यात जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर शहरात अधूनमधून तुरळक स्वरूपात पाऊस झाला. दिवसभर हा खेळ सुरूच होता.

Web Title: jalgav news rain coming