रेशन दुकानदार ऑगस्टमध्ये संपावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

जळगाव - राज्यातील रेशन दुकानदारांना शासनात सामावून घेऊन 40 ते 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे, रेशन दुकानदारांच्या मागण्या शासनाने एक महिन्यात मान्य न केल्यास 1 ऑगस्टपासून राज्यभरातील रेशनिंग दुकानदार संप करतील. संप काळात एकही दुकानदार माल उचलणार नाही, असा ठराव रेशन दुकानदारांच्या आज येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकिपर्स व हॉकर्स परवानाधारक संघटना फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक अध्यक्ष गजानन बाबर (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जळगाव, हिंगोली, नांदेड, पुणे, सोलापूर, जालना, वर्धा, नाशिक, बीड, नगर, सातारा, उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची उपस्थिती होती.

Web Title: jalgav news ration shopkeeper on strike in august