सेवानिवृत्त प्राध्यापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

आजाराला कंटाळून जीवन संपविल्याचा कुटुंबियांना अंदाज

आजाराला कंटाळून जीवन संपविल्याचा कुटुंबियांना अंदाज
जळगाव - शिरसोली रोडवरील जीवन मोती हाउसिंग सोसायटीतील रहिवासी पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध सेवानिवृत्त प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त करण्यात आला असून तपासात नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

जीवन मोती हाउसिंग सोसायटीतील रहिवासी तथा अकोला कृषी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गोपाळराव एकनाथ जगताप (वय 75) यांनी सकाळी साडेसहा वाजेपूर्वी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गोपाळराव नातीसोबत सकाळी नियमित फिरायला जात होते. मात्र, आज बाबा अजून कसे उठले नाही म्हणून नात बघण्यासाठी गेली. जिन्याकडील दार बंद असल्याने तिने ठोठावण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही. दार उघडल्यावर गोपाळराव यांनी जिन्याच्या पोर्चमध्ये उपरण्यासारख्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दिनेश जगताप यांनी पोलिसांना घटना कळविल्यावर सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केल्यावर मृतदेह खाली उतरवण्यात आला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविल्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. औद्योगिक वसाहत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येच्या नेमके कारण अद्यापही कळाले नाही. मात्र आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: jalgav news retired professor suicide