भूमिगत केबलसाठी रस्त्यांची लावली ‘वाट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

परवानगीविना खोदकामाबद्दल अनामत जप्तीसह गुन्हा दाखल करणार
जळगाव - शहरात मोबाईल कंपनीकडून भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी परवानगीशिवाय खोदकाम करुन रस्त्यांची ‘वाट’ लावली आहे. ज्या कामांची परवानगी आहे ती मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असताना पावसाळा सुरू होऊनही ही कामे बंद झालेली नाहीत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

दरम्यान, काही ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच खोदकाम केल्याप्रकरणी तपासणी करण्यात आली असून त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असेही महापालिका सूत्रांनी सांगितले. 

शहरात मोबाईलच्या भूमिगत केबल टाकण्यासाठी महापालिकेला रिलायन्स- जिओ, भारती एअरटेल कंपनीने परवानगी मागितली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने या कंपन्यांकडून बॅंक गॅरंटी तसेच रनिंग मीटरप्रमाणे अनामत रक्कम घेऊन परवानगी दिली होती. रस्त्याच्या बाजूने, खोदलेले खड्डे पुन्हा रस्त्याच्या लेव्हलने करून ते डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणाद्वारे दुरुस्ती करून कंपनीची अनामत जप्त करणार
केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देताना महापालिकेने कंपनीकडून बॅंक गॅरंटी तसेच रनिंग मीटरप्रमाणे अनामत रक्कम घेतली होती. एअरटेल कंपनीने विनापरवानगी नेरी नाका, काव्यरत्नावली चौक, रामानंदनगर रस्ता तसेच अन्य ठिकाणी जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंतचे रस्ते आजूबाजूला खोदून ठेवले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन या कंपनीवर गुन्हा दाखल करून त्यांची बॅंक गॅरंटी जप्त करणार असल्याची माहिती बांधकाम विभागातील अभियंता सैंदाणे यांनी दिली.

Web Title: jalgav news road damage for underground cable