‘मनपा’कडून गाळेधारकांना नोटीस बजावणे सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील दोन हजार १७५ गाळेधारकांपैकी सुनावणी बाकी असलेल्या एक हजार ७०४ गाळेधारकांना महापालिकेतर्फे ‘८१ ब’नुसार सुनावणीची नोटीस बजावण्यास सुरवात झाली आहे. २४ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक एस. एस. फडणीस सुनावणी घेणार आहेत.

महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांची मुदत ३१ मार्च २०१२ ला संपुष्टात आली होती. त्यानुसार महापालिकेने पाचपट भाडे वसूल करण्यासाठी महासभेत ठराव (क्रमांक ४०) १९ डिसेंबर २०१६ ला केला होता. गाळेधारकांनी राज्य शासनाकडे धाव घेतल्यानंतर ठरावाला स्थगिती मिळाली होती. नगरविकास राज्यमंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीचा निर्णय अद्याप आलेला नाही. तसेच सदर ठरावाला स्थगिती दिल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत खंडपीठाने शासनाला नोटीस दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी कार्यवाही वर्षभरात पूर्ण करू, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानुसार दोन हजार १७५ गाळेधारकांपैकी काहींची सुनावणी झाली होती. आता उर्वरित गाळेधारकांची सुनावणी होईल.

अशी होणार सुनावणी
उपायुक्त लक्ष्मीकांत कहार हे महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, वालेचा मार्केट, शास्त्री टॉवर मार्केट, छत्रपती शाहू महाराज, जुने शाहू मार्केट, शाहू महाराज मार्केट येथील ८६७ गाळेधारकांची सुनावणी २४ जुलैपासून १ ऑगस्टदरम्यान दुपारी ३ ते ४ या वेळेत घेतील; तर सहायक संचालक एस. एस. फडणीस हे गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळा मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, रेल्वेस्थानक मार्केट, धर्मशाळा मार्केट, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई मार्केट, जुने बी. जे. मार्केटमधील ८३७ गाळेधारकांची ३ ते ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेतील.

Web Title: jalgav news shop owner notice by municipal