कायदेशीर बाबी तपासूनच गाळ्यांबाबत निर्णय घेणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

जळगाव - फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी कायदेशीर बाबी तपासूनच गाळ्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुदत संपलेले व थकबाकी असलेले गाळे ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील अठरा व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर गाळे जप्तीची टांगती तलवार आहे. त्याबाबत गाळेधारकांच्यावतीने सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद मंधवानी, राजेश वरयानी, बाबू कौरानी या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, शिरीष चौधरी, हरिभाऊ जावळे, श्रीमती स्मिता वाघ उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी गाळेधारकांची समस्या ऐकून घेतली. याबाबत सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: jalgav news shops decission after legal matter cheack