‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जळगाव - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून जळगावमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल- ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, क्रीडा, नवतंत्रज्ञान आदी विषयांतील तज्ज्ञ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

जळगाव - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून जळगावमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल- ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, क्रीडा, नवतंत्रज्ञान आदी विषयांतील तज्ज्ञ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापिठाच्याच अधिसभा सभागृहात परिषदेचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता जळगावचे महापौर नितीन लढ्ढा, कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते होईल. स्पेक्‍ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘समर यूथ समीट’ मोलाची भूमिका बजावत आहे. ‘यिन’च्या ‘समर युथ समिट २०१७’ साठी ‘स्पेक्‍ट्रम अकॅडमी’ मुख्य प्रायोजक असून, ‘निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ प्रायोजक आहे. ‘सीड इन्फोटेक‘ आणि ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ सहप्रायोजक आहेत. 
 

पहिल्या दिवसाचे मार्गदर्शक 
पहिल्या दिवशी (दि. ७) ‘स्पर्धेला सामोरे जाताना...’ या विषयावर स्पेक्‍ट्रम अकॅडमीचे सुनील पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय अन्य सत्रांसोबतच प्रामुख्याने दोन संवादसत्रे होणार आहेत. ‘राजकारण - वक्तृत्व, नेतृत्व, संघटन’ या विषयावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील युवकांना मार्गदर्शन करतील. दुपारनंतर ‘संवाद कलाकारांशी’ या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी व कथ्थक नृत्यांगना डॉ. अपर्णा भट यांचा कलाप्रवास नाट्यकलावंत हर्षल पाटील उलगडणार आहेत. परिषदेतील विविध सत्रांमध्ये निलय मेहता, चंद्रशेखर ठाकूर, दीपक शिकारपूर, सुजय खांडगे आणि डॉ. राम गुडगिला आदी नामवंत तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील अन्य तज्ज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

यांच्या सहकार्याने... 
‘यिन’च्या या अनोख्या शिबिराला स्थानिक पातळीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहआयोजकत्त्व आहे. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व धनाजीनाना चौधरी विद्याप्रबोधिनी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था 
परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी उद्या (५ जून) सायंकाळी सहापर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये, तर इतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर परिषदेत नोंदणी केली जाईल. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शन करून चालत नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याची जबाबदारीही शैक्षणिक संस्थांवर आहे. ‘सकाळ- यिन’तर्फे होणारी ‘यूथ समिट’ विद्यार्थ्यांना सर्वार्थाने मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास वाटतो. त्यामुळेच या मार्गदर्शक उपक्रमाला विद्यापीठातर्फे सहकार्य करीत आहोत. 
- प्रा. डॉ. पी. पी. पाटील, कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 
 
‘यिन’चे उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच नेहमीच उपयुक्त ठरतात. ‘यूथ समिट’ शिबिरातून राज्यभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान म्हणून आम्ही या उपक्रमासोबत आहोत.  
- शिरीष चौधरी, माजी आमदार 

विद्यार्थ्यांच्या विकासाची चळवळ म्हणून खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा लौकिक आहे. ‘यिन’तर्फे आयोजित ‘समर यूथ समिट’ विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल, याबद्दल खात्री वाटते. या शिबिराच्या आयोजनात सहाय्यभूत ठरण्याचे सौभाग्य केसीई सोसायटीला लाभत आहे. 
- नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई सोसायटी 

‘यिन’ समिट

केव्हा - मंगळवार (ता. ६) ते गुरुवार (ता. ८) सकाळी ११ ते सायंकाळी ६
कोठे - अधिसभा सभागृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 

(अधिक माहितीसाठी संपर्क- बापूसाहेब पाटील (भ्रमणध्वनी : ९१७५७५८६३०)

Web Title: jalgav news summer youth samit