दादावाडी परिसरात तरुणावर चाकू हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

दादावाडी परिसरात तरुणावर चाकू हल्ला 

जळगाव ः शहरातील दादावाडी मंदिरा समोर आज दुपारी पुर्ववैमनस्यातून एका तरुणावर दोण जणांनी धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

दादावाडी मंदिरा समोरून अनिल एकनाथ नन्नवरे (वय 23) हे दुपारी जात होते. यावेळी महेश पाटील उर्फ बेम्या, विशाल पाटील उर्फ बॉन्ड या दोघांनी अनिल नन्नवरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले. नन्नवरे रक्ताच्या थारोळ्यात पडले असतांना काही नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ नेले. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेवून पाहणी केली. तसेच भर दुपारी महामार्गालगत झालेल्या घटनेमुळे दादावाडी परिसरात घबराटीचे वातावरण होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news caku halla