खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर नजर!

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर नजर!

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर नजर! 

जळगाव : माध्यमिक अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक हे घरी खासगी शिकवणी घेतात किंवा अन्य खासगी क्‍लासेसमध्ये शिकविण्यास जात असतात. अशा शिक्षकांवर आता माध्यमिक शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. यासाठी तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर दोन, अशी 17 पथके नेमण्यात आली आहेत. 

माध्यमिक शाळेत कार्यरत असलेले बहुतांश शिक्षक छुप्या पद्धतीने, तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक खासगी शिकवण्या घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तक्रारीदेखील असताना माध्यमिक शिक्षण विभागाकडून आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात येत होते. यामुळे शिक्षकांचीदेखील मनमानी पद्धतीने शाळेत न शिकविता; खासगी क्‍लासेस घेऊन विद्यार्थ्यांना धडे दिले जातात. यात बऱ्याचदा विद्यार्थ्यांना क्‍लास लावण्याची सक्‍ती संबंधित शिक्षकांकडून करण्यात येत असते. पण, आता अशा शिक्षकांवर नजर ठेवण्याचे काम माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. तसे नियोजन आखण्यात आले आहे. 

तालुकास्तरावर पथक 
खासगी शिकवणी घेण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून पथक नेमण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील पंधरा तालुक्‍यांसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक भरारी पथक नेमण्यात आले आहे; तर जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील व उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात आले आहे. ही पथके खासगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांचा अचानक शोध घेण्यासाठी क्‍लासेसवर छाप टाकणार आहेत. 

...तर शिक्षकावर कारवाई 
शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकविणाऱ्या शिक्षकास खासगी क्‍लास घेण्यास मनाई आहे. तरीदेखील असे प्रकार सर्रास सुरू असून, ते रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांद्वारे शोध घेतला जाणार आहे. पथकाला असे शिक्षक आढळून आल्यास, पथकाकडून मुख्याध्यापकांना याबाबत कळविण्यात येईल. यानंतर मुख्याध्यापकाने "आरटीई ऍक्‍ट 2009 कलम 28' अन्वये शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com