कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा 

कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा 

जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. 
शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एकाचा बळीही गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र महापालिकेतर्फे त्यांची दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले, प्रदेश महिला आघाडीच्या मंगला पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा नीला चौधरी, प्रतिभा शिरसाठ, यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. कॉंग्रेस भवनपासून या प्रेतयात्रेस प्रारंभ झाला. टॉवर चौक, जयप्रकाश नारायण चौक मार्गे महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आली. या वेळी महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. 

संस्थांनी दिले आयुक्तांना निवेदन 
शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, बंद पथदिवे आदी मुलभूत समस्यांवर विविध संघटनांनी आज तिव्र भूमीका घेत महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिका प्रशासनाच्या कामांवर तिव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त करून जळगावरांनी अजून किती दिवस त्रास सहन करायचा असा प्रश्‍न आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना रोटरी क्‍लब व विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान केला
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news mnpavar mrocha