esakal | पाचपट दंड रद्दच्या ठरावाने  धास्तावले भाजप नगरसेवक 
sakal

बोलून बातमी शोधा

पाचपट दंड रद्दच्या ठरावाने  धास्तावले भाजप नगरसेवक 

पाचपट दंड रद्दच्या ठरावाने  धास्तावले भाजप नगरसेवक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचपट दंड रद्दच्या ठरावाने 
धास्तावले भाजप नगरसेवक
 

जळगावः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांना पाचपट दंडचा ठराव तत्कालीन महासभेने केला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर हा ठराव रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याने "घरकुल'प्रमाणेच या ठरावावर सह्या केल्याने आपण अडचणीत येणार की काय, असे नगरसेवकांना वाटू लागले आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी आयुक्तांना भेटून याबाबत चर्चा देखील केल्याची विश्‍वसनीय माहिती समोर येत आहे. 

महापालिकेच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली. गाळे कराराने देण्याबाबत 135 क्रमांकाच्या ठरावासह काही ठराव तत्कालीन महासभेने केले होते. मात्र, गाळेधारकांनी विरोध करून न्यायालयात धाव घेतल्याने तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी होऊन देखील प्रश्‍न मार्गी लागला नव्हता. त्यात गाळेधारकांडे थकबाकी असल्याने वसुलीसाठी मागील सत्ताधारी खानदेश विकास आघाडीने पाचपट दंड करण्याचा ठराव केला होता. मात्र, हा ठराव चुकीचा व अन्यायकारक असल्याने पाचपट दंडाचा ठराव रद्द करण्याची आग्रही भूमिका भाजपची होती. 2018 च्या महापालिका निवडणुकीत भाजपची महापालिकेत सत्ता आल्यावर काही महिन्यानंतर महासभेत पाच पट दंडचा ठराव रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. 

 
ठरावाने आर्थिक नुकसान 
गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी करण्यात आलेला पाचपट दंडचा ठराव रद्द केला होता. मात्र, हा ठराव महापालिकेच्या हिताचा नसून आर्थिक नुकसानीचा आहे. या ठरावामुळे भाजप नगरसेवकांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातल्या त्यात घरकुलच्या निकालामुळे ठराव करणाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने या निकालाचे पडसाद आता महापालिकेत उमटत आहे. 

नगरसेवकांची आयुक्तांकडे विचारणा 
घरकुल गैरव्यवहारात अनेक नगरसेविकांना देखील न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाचपट दंड रद्दच्या ठरावावर सह्या केल्या असल्याने आपण देखील अडचणीत येणार की काय, असे नगरसेविकांना तसेच प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांना वाटू लागले आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन अडचणीत येणार का, अशी विचारणा केली आहे. 
 

loading image
go to top