जळगावचे स्वप्नील, निशी ठरले  खानदेशातील पहिले "आयर्न मॅन'! 

जळगावचे स्वप्नील, निशी ठरले  खानदेशातील पहिले "आयर्न मॅन'! 

जळगावचे स्वप्नील, निशी ठरले 
खानदेशातील पहिले "आयर्न मॅन'! 

जळगाव ः शहरात रनिंगचे कल्चर वाढविणाऱ्या रनर्स ग्रुपचे सदस्य स्वप्नील मराठे आणि निशी माधवानी यांनी बिनतान (इंडोनेशिया) या खाडीवर आयोजित ट्रायथलॉन स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी होऊन स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही स्पर्धा साडेआठ तासांच्या आत पूर्ण करत खानदेशातून पहिले "आयर्न मॅन' ठरल्याचा बहुमान पटकाविला आहे. 

बिनतान (इंडोनेशिया) येथे 25 ऑगस्टला स्पर्धा झाली. यात जगातील एक हजार 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतातून 33 आणि महाराष्ट्रातून चारपैकी स्वप्नील व निशी या दोघांचा सहभाग होता. "आयर्न मॅन' (स्वीमिंग 1.9 किलोमीटर, सायकलिंग 90 किलोमीटर आणि रनिंग 21 किलोमीटर) अशा अत्यंत कठीण स्पर्धेतील सहभाग आणि तेथील अनुभव रनर्स ग्रुपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दोघांनी सांगितले. याप्रसंगी रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, डॉ. रवी हिराणी, विक्रांत सराफ, डॉ. प्रशांत देशमुख, उमेश महाजन, डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. 
मराठे यांनी स्पर्धेतील अनुभव सांगितले. त्यांनी सांगितले, की पोहण्याचा अनुभव नव्हता. पण, चार डिसेंबर 2018 ला औरंगाबाद येथे झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केल्याने आत्मविश्‍वास आला होता. यामुळे बिनतान येथील "आयर्न मॅन' स्पर्धेत सहभागी होऊन ती आठ तास आठ मिनिटांत पूर्ण केली. यात बिनतान खाडीच्या समुद्रात पोहायचे होते. 1.9 किलोमीटरचे अंतर 53 मिनिटे, सायकलिंग चार तास सहा मिनिटे आणि रनिंग दोन तास 45 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करता आली. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी वैभव सोनवणे, निनाद चौधरी आणि रनर्स ग्रुपचे सहकार्य लाभले आहे. 

माधवानी यांनी सांगितले, की एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन ती पूर्ण करायची होती. स्वीमिंग 46 मिनिटांत पूर्ण केल्यानंतर सायकलिंग सुरू केल्यानंतर अवघ्या एक किलोमीटरवर सायकल पंक्‍चर झाली होती. सायकलचे ट्यूब बदलवून पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण करत नाही; तोच सायकल पुन्हा पंक्‍चर झाली होती. यावेळी हिंमत खचली होती; परंतु स्वीमिंगमधील वाचविलेला वेळ येथे कामी आला. यामुळे सायकलिंग नंतर रनिंग पूर्ण करत स्पर्धा ठरलेल्या वेळेच्या दीड मिनिटापूर्वी पूर्ण करू शकलो. यात दीड मिनिटाचा विलंब झाला असता, तर "आयर्न मॅन' होऊ शकलो नसतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com