स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले 

स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले 

स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले 


जळगाव ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच शहरात आज प्लास्टिकमुक्त अभियानाचीही सुरवात देखील सुरू केली. या अभियानात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, महापालिका कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभाग घेवून शहरातील अनेक ठिकाणी स्वच्छता केली. 

महापालिका इमारतीपासून सकाळी ही मोहीम सुरू होईल. यावेळी प्रथम सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते, व्यापारी संकुलन, शाळा, महाविद्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय यासह अन्य शसाकीय कार्यालयात देखील स्वच्छता मोहिम आज राबविण्यात आली. तर कचऱ्यातून प्लॅस्टीक गोळा करून जमा झालेले प्लॅस्टीक हे रिसायकल साठी एका संस्थेला महापालिका प्रशासन देणार आहे. 

शाळा, महाविद्यालये, रस्ते, मार्केट झाले स्वच्छ 
शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध मार्केट, संस्था स्वच्छ होतील. त्या- त्या शाळा, महाविद्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी, मार्केटमध्ये व्यापारी, दुकानदारांनी आपापला परिसर स्वच्छता मोहिम केली. तसेच मुख्य रस्ते देखील स्वच्छ करण्यात आले. तसेच महापालिकेच्या 25 शाळांत शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी साफसफाई केली. 

सामाजिक संघटनांचा सहभाग 
स्वच्छता अभियानात 25 बचतगटांतील 2500 महिला, "मनपा'चे 1800 कर्मचारी, अधिकारी, 30 सामाजिक संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेत सहभागी झाले होते. त्यामुळे शहर आज चकाचक झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com