जवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप

राजेंद्र पाटील
बुधवार, 4 एप्रिल 2018

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला.

जळगाव : नांद्रा (ता.पाचोरा) जवळील आसनखेडा येथील जि.प.मराठी शाळेत येथील सिमा सुरक्षा बलातील जवान बाबुलाल दौलत पाटील यांचे चिरंजीव अविनाश बाबुलाल पाटील (बीएसएफ) यांनी आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करुण शाळेत येतात. अशा गरजु विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप केले. साधारण पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला. त्यानुसार आज शाळेतील मुलाना चप्पल वाटप केल्या. चपला भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहेरावरील आनंद पहाण्यासारखा होता.

यावेळी उपसरपंच कैलास पाटील, हिमंत पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, डाँ.राजेंद्र बोरसे, सयाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नांद्रा ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, पोलीस पाटील किरण पाटील, अंगणवाडी सेविका ,जि.प.शाळेतील मुख्यध्यापक संगिता पाटीलउपशिक्षक नाना पवळ, जयवंत खैरनार, निलीमा चव्हाण, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: jawan distribute chappals in Jalgaon

टॅग्स