नागपूरमार्गे जयनगर-बंगळुरू विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

दुरांतोला अतिरिक्त डबा


प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूर-मुंबई दुरांतो एक्‍स्प्रेसला 27,29, 31 ऑक्‍टोबर तसेच 2,4 आणि 6 नोव्हेंबरला अतिरिक्त थ्री टायर एसी डबा जोडला जाईल. तसेच 28, 30 ऑक्‍टोबर आणि 1, 3, 5, 7 नोव्हेंबरला द्वितीयसह तृतीय वातानुकूलित अतिरिक्त कोच राहतील.

दिवाळीनिमित्त सुविधा : साप्ताहिक तत्त्वावर आठ फेऱ्या

नागपूर, ता. 27 : दिवाळी सुट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्यात नागपूरमार्गे धावणाऱ्या जयनगर-बंगळुरू विशेष गाडीची भर पडली. ही साप्ताहिक गाडी 11 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान एकूण आठ फेऱ्या करेल.

गाडी क्रमांक 82531 जयनगर-बंगळुरू सुविधा विशेष गाडी 11 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान जयनगर येथून दर मंगळवारी सायंकाळी 6.20 वाजता रवाना होईल. बुधवारी रात्री 11.10 वाजता नागपूरला पोहोचेल आणि चौथ्या दिवशी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 3 वाजता बंगळुरू स्थानक गाठेल. तसेच 82532 बंगळुरू-जयनगर विशेष ट्रेन 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी बंगळुरू स्थानकावरून सुटेल. तिसऱ्या दिवशी रविवारी पहाटे 5.10 वाजता नागपूर स्थानकावर पोचेल आणि चौथ्या दिवशी दुपारी 11.45 वाजता जयनगर स्थानक गाठेल. या गाडीला दरभंगा, समस्तीपूर, बरौनी, पाटणा, आरा, बक्‍सर, मुगलसराई, मिरजापूर, चेवकी, मनिकपूर, सतना, कटनी, जबलपूर, इटारसी, नागपूर, बल्लारशा, वारंगल, विजयवाडा, गुड्डूर, रेनिगुन्टा, काटपाडी, जोलारपेठ्ठई स्थानकावर थांबा राहील. या गाडीला 1 प्रथम श्रेणी, एक टू टायर आणि दोन थ्री टायर एसी, 11 द्वितीय शयनयान राहतील.

 

 

Web Title: Jaynagar-Bangalore special train via Nagpur