नाशिकमधील सराफांचा गुंतवणूकदारांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

नाशिक - गुंतवणूकदारांना रोकड वा सोन्याचे दागिन्यांच्या ठेवीवर दरमहा चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शहरातील मिरजकर सराफ आणि गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स प्रा. लि.च्या संचालकांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सरकारवाडा पोलिसांत पल्लवी हर्षल उगावकर (रा. 10, तीर्थंकर, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी फिर्याद दिली असून सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी अशा 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्‍यता असून, मुख्य संशयित हर्षल नाईक हा 26 जूनपासून बेपत्ता झाला आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी गुंतवणुकीसाठी सराफ बाजारातील मिरजकर सराफ आणि गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स्‌ या सराफी व्यवसायाच्या दोन फर्म एप्रिल 2015 मध्ये स्थापन केल्या. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या ओळखीतील ग्राहक, सदस्यांना दोन्ही फर्ममध्ये रोख स्वरूपात वा सोन्याचे दागिने तारण ठेवल्यास त्यावर दरमहा एक ते दीड टक्का व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2017 या कालावधींमध्ये अनेकांनी ठेवी तारण ठेवल्या. मात्र त्या रकमेवरील व्याज संशयितांनी दिले नाही. एवढेच नव्हे, तर गुंतवणुकीची रक्कम वा तारण सोनेही परत केले नाही. त्यामुळे सुमारे 1 कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

Web Title: jewellers cheating to investor crime