झींगल बेल झींगल बेल झींगल ऑल ते वे..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नाशिक : कुठे सांताक्‍लॉजच्या वेशातील सॅन्टा,कुठे चॉकलेट-केकचे वाटप, कुठे येशु जन्मोत्सवाचा देखावा, कुठे सजवलेले ख्रिसमस ट्री अशी येशु जन्मानिमीत्त शहरांत उत्साह दिसत होता.

नाशिक : कुठे सांताक्‍लॉजच्या वेशातील सॅन्टा,कुठे चॉकलेट-केकचे वाटप, कुठे येशु जन्मोत्सवाचा देखावा, कुठे सजवलेले ख्रिसमस ट्री अशी येशु जन्मानिमीत्त शहरांत उत्साह दिसत होता.

येशु ख्रिस्त जन्मोत्सव अर्थात नाताळ सणासाठी शहरांतील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील कॉलेजरोड, गंगापुररोड भागांत सॅन्टाक्‍लॉजच्या वेशांत तरूणांना आकर्षीत करण्यासाठी विविध दूकान, हॉटेलव्यवसायिकांनी सजावट आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. यंदा नाताळ सण रविवारी आल्यामुळे अनेकांनी या रस्त्यांवर हा सणाची मजा लुटली.

मुख्य रस्त्यांना सजविण्यात आले असून तेथे जिंगलबेल सह अनेक गितांनी लोकांचे मनोरंजन करण्यात येत होते. शहरांतील विविध संस्थांनी नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर अनाथ मुलांना गिफ्टचे वाटप, गरीबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम राबविले. तरूणाई या सगळ्यांत पुढे असल्याचे चित्र आहे. इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांनी रविवारी नाताळ आल्यामुळे शनिवारीच हा सण साजरा केल्यामुळे बच्चेकपंनीने देखिल या सणासाठी शहरांतील अनेक ठिकाणी जाऊन मजा लुटली. बाल येशुच्या जन्माची कथांचे पोस्टर आणि देखावे देखिल ठिकठिकाणी साकारण्यात आले होते.

केके आणि चॉकलेटला मागणी
या सणातील सगळ्यात मोठे आकर्षण असलेल्या केक आणि चॉकलेटला या निमीत्ताने मागणी होती. गिफ्ट पॅक करून आकर्षक मोजांमध्ये या चॉकलेटची सजावट करण्यात आली होती. सॅन्टा आणि त्या संबंधित अनेक गिफ्ट यंदाचे मुख्य आकर्षण ठरले. गिटार वाजविणारा, झाडाखाली बसलेला, चॉकलेट वाटणारा अशा विविध फरचे सॅन्टक्‍लॉज विक्रीसाठी उपलब्ध होते.

Web Title: jingle bell all the way