‘जू..’ आत्मकथनास पद्मश्री रणजित देसाई वाङ्मय पुरस्कार जाहीर    

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

निफाड : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू..’ या आत्मकथनाला कोवाड, जि. कोल्हापूर येथील पद्मश्री रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘पद्मश्री रणजित देसाई वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख ५००० रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतील तज्ज्ञ परीक्षकांनी एकमताने ‘जू..’ या आत्मकथनाची निवड केली आहे. 

पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून कुठल्याही प्रकाराचा प्रस्ताव न मागवता, अस्सल लेखणीच्या उर्मीचा शोध घेऊन तो दिला जाणार आहे, पहिल्याच पुरस्कारावर ऐश्वर्य पाटेकर यांचे नाव कोरले गेले. येत्या ८ एप्रिल रोजी कोवाड येथे सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या शुभहस्ते, रणजित देसाई यांच्या जेष्ठ कन्या पारुताई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध लेखक सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थितीत पाटेकरांना हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. 

ऐश्वर्य पाटेकर हे के. के. वाघ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या ‘भुईशास्त्र’ या पहिल्याच कवितासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी आणि राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. उडीया, बंगाली, उर्दू, हिंदी, इंग्रजी आदी भाषांत कवितांचे अनुवाद झाले आहे.
पुरस्कार प्राप्त ‘जू’ आत्मकथनाचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.

स्वामी, श्रीमान योगी, राधेय अशा कादंबऱ्या लिहून ज्यांनी मराठी वाड्मय खऱ्याअर्थानं समृद्ध केलं; अशा पद्मश्री रणजित देसाई यांच्या नावचा पुरस्कार शिवाय त्यांच्याच जन्मगावी मला मिळतोय, हे माझं भाग्य मी समजतो, जे मला माझ्या शब्दांनी बहाल केलं, अशी भावना प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांनी व्यक्त केली. 

Web Title: ju story wins ranjit desai literature award