Nandurbar News: तापी नदीपुलावरून उडी; तरुणाचा मृतदेह सापडला

dead body found
dead body foundesakal

Nandurbar News : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीच्या पुलावरून शुक्रवारी (ता. ११) दुपारी उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेह आराळे (ता. नंदुरबार) गावाच्या काठावर तरंगताना आढळला. रात्री उशिरा मृतदेहावर शहादा येथे अत्यसंस्कार करण्यात आले. (Jump from Tapi river bridge body of young man found Nandurbar News)

सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावर मोटारसायकलने आलेल्या तरुणाने मोटारसायकल पुलावर लावून नदीपात्रात उडी घेतल्याची घटना (ता. ११) दुपारी घडली होती. या वेळेस काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते.

पाडळदा (ता. शहादा) येथील रहिवासी व हल्ली मुक्काम शहादा येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे मयूर मोहन बच्छाव (वय २७) असे या तरुणाचे नाव आहे. मृत मयूर बच्छाव शहादा येथील एका बँकेच्या शाखेत फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dead body found
Accident : आधी कारने दिली दुचाकीला धडक नंतर महिलेला चिरडले; महिलेसह दोघांचा मृत्यू

दोन दिवसांपासून त्याचे तापी नदीपात्रात शोधकार्य सुरू होते. शोध सुरू असताना रविवारी (ता. १३) रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह नंदुरबार तालुक्यातील आराळे गावाच्या नदीच्या पाणथळावर तरंगताना मिळून आला.

राजेंद्र बच्छाव यांनी त्याला दत्तक घेतलेले होते. त्याच्या मागे वडील, आई, पत्नी, पाच बहिणी असा परिवार आहे. शहादा येथील अमरधाममध्ये रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

dead body found
Nagpur Crime : आईचे रागावणे असह्य झाल्याने मुलाने घेतला गळफास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com