बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

अमळनेर (जळगाव) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा तसेच बागायती क्षेत्रानुसार नवीन पंचनामे करून अनुदान मिळावे यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदनही देण्यात आले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी, शेतकरी प्रतिनिधी व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तहसीलदार पाटील हे तलाठी नवीन पंचनामे करण्यासंदर्भात आदेशित करणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृह पासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते. तालुक्यात 100% कोरडवाहू पंचनामे करण्यात आले आहे, अनेक ठिकाणी बागायती क्षेत्र असतानाही तलाठी यांनी या क्षेत्राचे सरसकट पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वस्तुस्थितीला धरून पंचनामे करावेत  शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा व शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी 6700 रुपये तर बागायती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 13000 रु.अनुदान देण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पराग पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अनिल शिंदे, प्रा. सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, प्रा.सुभाष पाटील अंतुर्लीचे शिवाजी रामराव पाटील, धनगर पाटील, प्रवीण जैन, विजय पाटील, प्रा. पि.के. पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील आदीसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: justice to bollworm affect farmer