Nandurbar News : थकबाकी भरणाऱ्या कुटुंबातील महिलांचा सन्मान; ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय

Women
Womenesakal

कळंबू (जि. नंदुरबार) : ग्रामपंचायत २०२३-२४ चालू वर्षाची पाणीपट्टी, घरपट्टी, थकबाकी शंभर टक्के कर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांना सन्मानित करण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

यासाठी महिलांची नावे ईश्वर चिठ्ठीतून काढून त्यांच्या हाती ध्वजारोहण करून महिलांना सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतला. (Kalambu Gram Panchayat decision respecting women in dues paying families nandurbar news)

बदलत्या युगात प्रत्येक स्तरावर महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. शैक्षणिक प्रगती असो वा व्यावसायिक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसून येत आहेत. शहरी महिलांबरोबर ग्रामीण महिलांनाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सन्मानित करून, त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने शहादा तालुक्यातील कळंबू ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आर. आर. बोरसे, उपसरपंच योगीराज बोरसे, ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गंडे, ग्रामपंचायत सदस्य यांनी हा उपक्रम हाती घेतला.

यासाठी २०२३-२४ या चालू वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी भरणाऱ्या कुटुंबातील महिलांची नावे ईश्वर चिठ्ठीत समाविष्ट करून, त्यांपैकी कोणत्याही तीन चिठ्ठ्या काढून, त्यातील निवड झालेल्या तीन महिलांच्या हस्ते अनुक्रमे १ एप्रिल, १ मे महाराष्ट्र दिवस, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Women
Deola Market Committee Election : निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची? 51 उमेदवारी अर्ज दाखल

यामुळे महिलांचा सन्मान होण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून ६ एप्रिल २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कुटुंबातील महिला सदस्यांचे नाव ईश्वर चिठ्ठीत समाविष्ट करण्याचे योजिले आहे. म्हणून जास्तीत जास्त कुटुंबांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे ग्रामपंचायत प्रशासनाने कळविले आहे.

निर्णयाचे स्वागत

लोकनियुक्त सरपंच आर. आर. बोरसे यांनी सरपंचपदाच्या कालावधीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालय अथवा गावातील विविध स्तरांवरील ध्वजारोहण स्वतःच्या हस्ते न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मान गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक, महिलावर्ग, ग्रामपंचायत सदस्य अथवा इतर स्तरांवरील मंडळींना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना सन्मानित करण्यात येईल. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Women
Onion Crop Crisis : कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात आणले अश्रू; ठोक बाजारात कवडीमोल भाव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com