Dhule Water Shortage
esakal
कापडणे: बोरी पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे. कानोली व बोरी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कानोली नदीच्या पुरात तरवाडेसह सहा गावांची जलवाहिनी वाहून गेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या गावांमध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे.