कपाशी बियाण्यांच्‍या २५ लाख पाकिटांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पहिल्या टप्प्यात दोन लाख १८ हजार पाकिटे दाखल; शेतकऱ्यांकडून अद्याप खरेदी नाही

जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्या अनुषंगाने खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कामांना गती आली असून, बियाण्यांची बाजारपेठही विक्रीसाठी सज्ज झाली आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी २३ लाख पाकिटांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असता पंचवीस लाख बारा हजार ३११ कपाशी बियाण्यांची पाकिटे पुरवठ्यास मंजुरी मिळाली आहे. 

राज्यात कपाशी लागवडीच्या दृष्टीने जळगाव जिल्हा आघाडीवर असतो. यामुळे बियाण्यांची होणारी मागणी आणि पुरवठा यात तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन तयार करत कपाशीच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात साधारण साडेचार लाख हेक्‍टर कपाशी लागवडीचे कृषी विभागाने नियोजन केले असून, यासाठी पंचवीस लाख बारा हजार ३११ कपाशी बियाण्यांच्या पाकिटांची मागणीही नोंदविली आहे. यात विविध ४३ कंपन्यांचे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात दोन लाख अठरा हजार तीनशे पाकिटांचा पुरवठा झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे.

मक्‍याचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता
बियाणे मार्केटमध्ये सध्या केवळ कपाशी बियाणे दिसत आहे. तरी दरवर्षी मक्‍याच्या बियाण्यांचीही मागणी होत असून, यामुळे यंदाही मका लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश कंपन्यांकडून मक्‍याच्या वाणाचे कणीस दाखवून आकर्षकपणे मांडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी आकर्षित करत आहेत. 

तुरळक खरेदी सुरू
सद्यःस्थितीत विविध कंपन्यांच्या बियाण्यांच्या बावीस हजार पाकिटांचा पुरवठा झाला आहे. पूर्वहंगामी लागवडीची सुरवात साधारण २५ मेनंतर होत असल्याने सध्या पूर्वहंगामी लागवडीसाठी तुरळक विक्री सुरू झाली आहे. यामुळे बियाणे विक्रीच्या दुकानांत शेतकऱ्यांची खरेदीसाठी फारशी गर्दी अजून तरी झालेली पाहावयास मिळत नाही.

Web Title: kapashi seed 25 lakh packet permission