शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर कपील पाटील-गोविंद चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नाशिक - शिक्षक भारती संघटनेच्या नाशिक विभागीय बैठकीच्या निमित्ताने आमदार कपिल पाटील यांनी आज प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत सहायक शिक्षण उपसंचालक बी.टी. गोविंद यांच्याशी चर्चा केली.

नाशिक - शिक्षक भारती संघटनेच्या नाशिक विभागीय बैठकीच्या निमित्ताने आमदार कपिल पाटील यांनी आज प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत सहायक शिक्षण उपसंचालक बी.टी. गोविंद यांच्याशी चर्चा केली.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन, समायोजन,चटोपाध्याय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, शिक्षण सेवकांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांबाबत आमदार कपील पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या वेळी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक वेतन पथकाचे अधिकारी शालेय पोषण आहार अधिक्षक व संघटनेचे सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चार जिल्ह्यातील अतिरिक्त पदे,उपलब्ध पदे आणि रिक्त पदे या विषयावर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय फरक बिल, वेतन दरमहा एक तारखेला येत्या जानेवारीपासून देण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे साहेब व वेतन पथकाचे प्रमुख फुलसुंदर यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. चटोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी दुसऱ्या टप्प्यातील सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

राज्य सरचिटणिस भरत शेलार, संतोष बोरसे, राजेंद्र लोंढे, कैलास पगार, राकेश पाटील, राजू निरभवणे, के के अहिरे, दशरथ गोवेकर, दिलीप धांडे, कांतीलाल जाधव, नवनाथ गिते, गणेश इनामदार, संतोष बोरसे, संतोष चोळके, निवृत्ती बागूल, योगेश पगार, नजिम देशमुख उज्ज्वल हिरे, सुनील गांगुर्डे, देविदास देशमुख, संदीप शेजवळ आदी उपस्थित होते. नाशिक विभागीय शिक्षक भारती संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर विविध संघटनांच्या शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केला.

Web Title: kapil patil govind discussion on teacher issue