काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या गावितांच्या विरोधात विधानसभेला आंतरराष्ट्रीय खेळाडू?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झालेल्या असताना त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत यांचे नाव चर्चेत आले आहे. सौ. गावित यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याने कविता निवडणूक लढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

नाशिक ः इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झालेल्या असताना त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत यांचे नाव चर्चेत आले आहे. सौ. गावित यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याने कविता निवडणूक लढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

भाजपमधील "मेगा' भरती अन्‌ शिवसेनेतील प्रवेशाची लगीनघाई या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेची युती होईल की नाही याबद्दल स्थानिकांच्या तंबूत धास्तीचे वातावरण आहे. त्यास मात्र इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर हा विधानसभा मतदारसंघ अपवाद राहणार काय, यादृष्टीने कविताचे नाव चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबद्दल कविताच्या कुटुंबीयांशी संपर्क केला, त्या वेळी कुटुंबीयांनी कानावर हात ठेवले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, कविता राऊत यांच्या उमेदवारीसाठी आम्ही विचार करत आहोत आणि चार ते पाच नावांवर आमचा विचार सुरू आहे असे सांगितले. फोडाफोडीच्या राजकारणात आम्ही कुणाचे नाव जाहीर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavita raut may contest election in igatpuri vidhansabha seat