केनिंगस्टन क्‍लबला मनपाकडून सूडबुद्धीने नोटीस

Nashik-Municipal
Nashik-Municipal

नाशिक - ग्रीनफिल्ड लॉन्सवर बेकायदा कारवाई केल्यानंतर न्यायालयात तोंडघशी पडलेल्या महापालिका प्रशासनाने ग्रीनफिल्डचे संचालक प्रकाश मते यांच्या दुसऱ्या मालमत्तेला नोटीस बजावली आहे. केनिंगस्टन क्‍लबच्या रिटेनिंग वॉलमुळे गोदावरीतीरी बांधलेली गॅबियन वॉल पडल्याचा दावा महापालिकेच्या अग्निशमन दलाने केला आहे. याबाबत नुकसानभरपाई देण्याबरोबरच २४ तासांत मलबा हटविण्याचा सूचना केल्या आहेत. ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप संचालक विक्रांत मते यांनी केला. याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. 

उच्च न्यायालयाकडून स्थगिती असतानाही ग्रीनफिल्ड लॉन्सवर कारवाई केल्याने महापालिका तोंडघशी पडली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी न्यायालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली. तोडलेले बांधकाम महापालिकेच्या खर्चाने उभारण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. न्यायालयात महापालिकेची शहरभर नाचक्की झाल्याने अग्निशमन दलाने कारवाईचे दुसरे हत्यार उपसले. ग्रीनफिल्डचे संचालक असलेल्या प्रकाश मते व विक्रांत मते यांच्या 

मालकीचा चाँदशी शिवारात केनिंगस्टन क्‍लब आहे. क्‍लबच्या आरसीसी रिटेनिंग वॉल महापालिकेच्या गॅबियन वॉलवर पडल्याने आर्थिक नुकसान झाले असून, त्याबदल्यात एक कोटी २० लाखांची नुकसानभरपाई देण्याची नोटीस आहे. मलबा गोदावरीत पडल्याने प्रवाहाची रुंदी कमी झाली असून, पूरजन्य आपत्ती निर्माण झाल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला. चोवीस तासांत मलबा हटविण्याच्या सूचना दिल्या. 

गॅबियन वॉलला यापूर्वीच तडे
केनिंगस्टन क्‍लबचे संचालक विक्रांत मते म्हणाले, की महापालिकेने सूडबुद्धीने नोटीस पाठवली. केनिंगस्टन क्‍लब महापालिका हद्दीबाहेर आहे. २०१० च्या सुमारास सिंहस्थासाठी शिवरस्त्याची मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार गोदावरीलगतचा रस्ता हस्तांतरित करण्यात आला. महापालिकेने तेथे डांबरी रस्ता व गॅबियन वॉल बांधली; परंतु काही महिन्यांतच रस्ता व गॅबियन वॉल पुरात वाहून गेला. केनिंगस्टन क्‍लबची आरसीसी रिटेनिंग वॉल बांधण्यापूर्वी ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेला तसे पत्राद्वारे व छायाचित्राद्वारे माहिती कळविली होती. पण महापालिकेने दुर्लक्ष केले. त्याव्यतिरिक्त महापालिकेच्या वास्तुविशारद पॅनलचे श्री. धुमणे यांनीही रस्त्याचे काम पक्के नसल्याने गॅबियन वॉल वाहून गेल्याचा अहवाल दिला. त्यानंतर केनिंगस्टन क्‍लबची आरसीसी रिटेनिंग वॉल बांधली गेली. 

महापालिकेने बेकायदेशीर नोटीस पाठवली असून, त्यामधील मजकूर खोटा आहे. सोमवारी पालिकेविरोधात मानहानीचा व चुकीची नोटीस पाठविल्याचा दावा न्यायालयात दाखल करू.
- विक्रांत मते, संचालक, केनिंगस्टन क्‍लब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com