खडसेंकडून दमानिया यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला.

जळगाव : अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला.  

जिल्हा न्यायालयात आज अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल करण्यासाठी एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता कार्यकर्त्यांसह आले होते. दमानिया यांनी 'टि्वटर' या सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या मजकुरातून उच्च न्यायालय आणि खडसेंची बदनामी केली. याबाबत भा. दं. सं. कलम 500 नुसार मानहाणीचा फौजदारी दावा खडसेंनी न्यायालयात आज सादर केला. 

Web Title: Khadse filed a criminal case against Damania