खामखेडा परिसरात उन्हामुळे मंडप टाकून कांदा साठवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

खामखेडा (नाशिक) - कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळी कांदा काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी चांगला पाऊस व वर्ष भर कांद्याला चांगला बाजार असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झालेली होती. देवळा तालुक्यात ३०८६१ शेतकर्यांनी १९१६१ हेक्टर वर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. सध्या उन्हाळी कांदा काढणी हंगाम असल्याने कांदा उत्पादक शेतकरी  कांदा  साठवणूक करत आहेत.

खामखेडा (नाशिक) - कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळी कांदा काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी चांगला पाऊस व वर्ष भर कांद्याला चांगला बाजार असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झालेली होती. देवळा तालुक्यात ३०८६१ शेतकर्यांनी १९१६१ हेक्टर वर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. सध्या उन्हाळी कांदा काढणी हंगाम असल्याने कांदा उत्पादक शेतकरी  कांदा  साठवणूक करत आहेत.

कांद्याला मिळत असलेल्या सरासरी आठ्से ते नऊशे बाजार भावामुळे  शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीवर  जोर देऊ लागला आहे.सध्या कसमादे भागातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरु असल्याने व कांदा शेतात पडून रहाण्या पेक्षा शेतकरी साठवणूक करण्याच्या जागेवर वाहून आणत साठवण्यासाठी ची तयरी करत आहेत.

ह्या वर्षी पावसामुळे कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने शेतकर्यांनी दोन ते तीन टप्प्यात लागवड केली आहे.डिसेंबर अखेरीस पर्यंतचा बराचसा कांदा चांगला असून जानेवारी महिन्यातील लागवडीच्या उद्पादानावर मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाकडून सुरवातीच्या लागवडीच्या कांदा सध्या शेतकरी वर्ग साठवनुकीवर भर देत आहे. खामखेडा सह सावकी विठेवाडी तशेच बागलाण,देवळा व मालेगाव परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे

पावसामुळे कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने शेतकर्यांनी दोन ते तीन टप्प्यात लागवड केली आहे.डिसेंबर अखेरीस पर्यंतचा बराचसा कांदा चांगला असून जानेवारी महिन्यातील लागवडीच्या उद्पादानावर मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाकडून सुरवातीच्या लागवडीच्या कांदा सध्या शेतकरी वर्ग साठवनुकीवर भर देत आहे.

खामखेडा परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याचीचाळीत साठवणूक करत होता.मात्र माघील वर्षी कांद्याने चांगला पैसा मिळवून दिल्याने  शेतकरी वर्गाने अधिकाधिक कांदा साठवणुक करण्यावर  भर दिली आहे. 

सध्या कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाने चाळीशी पार केल्याने शेतकरी कांदा साठवणूक करतांना कांदा वर सावली साठी तजवीज करतांना दिसत आहेत.अनेत ठिकाणी  ताडपत्री अथवा मंडप टाकून सावली करत कांदा साठवत आहेत.

Web Title: khamkheda farmers onion storage