खानदेश रनमध्ये धावणार नागपूरचे वीस स्पर्धक ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जळगाव : धावण्यातून ऊर्जा मिळवत तंदुरुस्ती ठेवण्याचा मंत्र नागपूरच्या भोयर दाम्पत्याने जपला आहे. राज्यातच नव्हे; तर देशात होणाऱ्या प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन हे पती- पत्नी धावत असतात. या दाम्पत्याने जळगावच्या खानदेश रन मॅरेथॉनमध्ये गतवर्षी सहभागी होऊन बाजी मारली होती. यंदा देखील त्यांचा सहभाग असून, त्यांच्यासमवेत नागपूरच्या आणखी वीस जणांना खानदेश रनमध्ये धावण्यासाठी आणत आहेत; हे यंदाच्या रनचे वैशिष्ट्य ठरणार आहे. 

नागपूर येथील नागोराव भोयर व त्यांच्या पत्नी शारदा भोयर हे दांपत्य गेल्या अकरा वर्षांपासून म्हणजे 2008 पासून प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन प्रत्येक मॅरेथॉनमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहण्याचा मान देखील मिळवत आहेत. मॅरेथॉन स्पर्धेतून मिळणाऱ्या रकमेतून घर चालविण्याचे काम हे दांपत्य करत आहे. गेल्यावर्षी जळगावात झालेल्या खानदेश रनमध्ये दोघांनी दहा किलोमीटर गटातून सहभाग घेतला आणि दोघांनीही बाजी मारली होती. वय वाढले असले, तरी धावण्याची जळलेली सवय पाय थांबू देत नाही आणि मॅरेथॉनमध्ये धावण्यास वळत असतात. 

वीस जणांची दिली एंट्री 
भोयर दाम्पत्याने गतवर्षी खानदेश रन मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटर गटात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदा देखील हे दांपत्य आकर्षण राहणार असून, यंदाच्या 21 किलोमीटर गटाची मिनी मॅरेथॉन स्पर्धा देखील जिंकणार का? याकडे लक्ष असणार आहे. मुख्य बाब म्हणजे भोयर दांपत्याने या स्पर्धेत केवळ सहभाग नोंदविला नाही; तर आपल्यासोबत नागपूरच्या आणखी वीस जणांना घेऊन येत आहे. खानदेश रनसाठी वीस जणांची एंट्री करून दिली आहे. 

आज अंतिम सेशन 
खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेची तयारी म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून आठवड्यातील तीन दिवस प्रॅक्‍टिस सेशन घेण्यात येत आहे. या सेशनमधून स्पर्धकांकडून धावण्याचा सराव करून घेण्यासोबतच टिप्स देण्यात येत आहे. यात यंदाच्या स्पर्धेसाठीचे अंतिम सेशन उद्या (ता. 17) खानदेश सेंट्रल येथे घेण्यात येत आहे. यात सरावासोबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. यात रनच्या शेवटच्या आठवड्यात काय करावे, काय खावे, पाणी किती प्यावे; यासंदर्भात निनाद चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khandesh run marethon nagour 20 runner