मॅरेथॉन मार्गाची दुरुस्ती, पथदिवे लावणे सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

जळगाव : शहरात खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेची आयोजकांकडून तयारी जोरात सुरू आहे. त्याच सोबत महापालिका प्रशासनाकडून मॅरेथॉन मार्गाची दुरुस्ती, पथदिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. तर महामार्गावरील रस्त्याची देखील स्वच्छता केली जाणार आहे. 

जळगाव : शहरात खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेची आयोजकांकडून तयारी जोरात सुरू आहे. त्याच सोबत महापालिका प्रशासनाकडून मॅरेथॉन मार्गाची दुरुस्ती, पथदिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. तर महामार्गावरील रस्त्याची देखील स्वच्छता केली जाणार आहे. 

तीन वर्षांपासून खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धा जळगाव शहरात घेतली जात आहे. दरवर्षी स्पर्धेला मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली होती. तर यंदाचे वैशिष्ट म्हणजे जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच मिनी मॅरेथॉन 
होत आहे. तशी स्पर्धेची उत्सुकता देखील वाढत असून स्पर्धा यशस्वितेसाठी देखील तयारी आयोजकांसोबत प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडून देखील 21 किलोमीटर मार्गातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पहाटे पाच वाजता मिनी मॅरेथॉन सुरू होणार असल्याने रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू करणे, जिथे नाही तेथे पथदिवे नवीन बसविण्याचे काम जोमात सुरू केले आहे. 

आरोग्य विभागाकडून मार्गाची स्वच्छता 
महापालिका आयुक्तांनी मॅरेथॉन स्पर्धेच्या महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या तयारीचा आढावा काही दिवसापूर्वी घेतला आहे. त्यानुसार संबंधित विभागांना सूचना दिलेल्या असून आरोग्य विभागाला मॅरेथॉन मार्गाची स्वच्छता करणे, जागो जागी स्वच्छता कर्मचारी तसेच इतर विभागाचे कर्मचाऱ्यांची ठेवण्याचे सूचना दिलेल्या आहे. महापालिकेचे विविध विभागातील 50 कर्मचारी यावेळी असणार आहेत. 

21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन 
जळगाव रनर ग्रुपतर्फे यंदा औरंगाबाद, सातारा हिल्स, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन सारखी जळगावात अशा प्रकारची हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यात सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, डि मार्ट चौक, लांडरखोरी, महाबळ, काव्यरत्नावली, महाबळ, काव्यरत्नावली मार्गे सागरपार्क येथे मॅरेथॉनचे समारोप होणार आहे. 
 
मागील वर्षा प्रमाणे महापालिका प्रशासनाकडून खानदेश मॅरेथॉन स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. यात रस्त्यातील खड्डे बुजविणे, मार्गातील पथदिवे विद्युत विभागातर्फे लावणे तसेच मार्गाची स्वच्छता सर्व कचरा कुंड्या उचलल्या जाणार आहे. कुठे समस्या येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांची देखील स्पर्धेच्या दिवशी नेमणूक केली आहे. 
-सुनील भोळे, बांधकाम शहर अभियंता, महापालिका. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khandesh run marethone sonday 21 km road reperning muncipal corporation