मंदाणे- शहादा तालुक्यातील जयनगर उपवन परिक्षेत्रातील खापरखेडा बिटमधील रोपवन जंगलात भरदिवसा भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत हजारो वृक्ष खाक झाले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली आहे. विशेष म्हणजे ही आग दोन संशयितांनी लावली असल्याचे समोर आले आहे.