Khashaba Jadhav Kusti Spardha : धुळ्याकडून सहा पदकांची लयलूट

Dhule News
Dhule News esakal

धुळे : पुणेस्थित क्रीडा व युवक संचालनालय, राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा प्रशासनातर्फे येथील गरुड मैदानावर राज्यस्तरीय खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) करंडक कुस्ती स्पर्धेचा शुक्रवारी (ता. २४)

सायंकाळनंतर पारितोषिक वितरणातून जल्लोषात समारोप झाला. (Khashaba Jadhav Kusti Spardha 6 medals won by wrestlers Dhule news)

यात येथील मल्लांनी सहा पदकांची लयलूट केल्याने त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर

जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, क्रीडा विभागाच्या नाशिक विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा

क्रीडाधिकारी आसाराम जाधव, माजी महापौर जयश्री अहिरराव, जिल्हा परिषद सभापती संजीवनी शिसोदे, प्रमुख स्पर्धा निरीक्षक संदीप भोंडवे, तांत्रिक समितीप्रमुख दिनेश गुंड, कुस्तीगीर परिषदेचे सदस्य उमेश चौधरी, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Dhule News
Dhule News : 14 मार्चपासून सरकारी कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० संघ आणि ६५० पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी गरुड मैदानावर तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले होते.

धुळे शहरात १९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धा होत असल्याने कुस्तीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महापालिका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचे बहुमोल साहाय्य लाभले.

धुळ्याची कामगिरी अशी

स्पर्धेत ग्रिकोरोमन प्रकारात ६७ किलो वजनी गटात धुळ्याच्या रोहित शिंदे याला कास्यपदक, महिला प्रकारात ५५ किलो वजनी गटात साक्षी शिंदे हिला कास्यपदक, तर फ्री स्टाईल प्रकारात ७४ किलो वजनगटात जतीन आवाळे याला सुवर्णपदक, ६१ किलो वजनी गटात नाबील शहा याला रौप्यपदक, ९२ किलो वजनगटात द्रविड आघाव याला रौप्यपदक, तर ७९ किलो वजनगटात प्रशांत फटकाळ याला कास्यपदक मिळाले. तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात आणि विविध दहा वजनी गटात या स्पर्धा झाल्या.

Dhule News
Nashik News : चुंचाळे शिवारातील 10 भंगारची दुकाने आगीत खाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com