Dhule News : खुशालच्या पाठीवर सत्कार, सन्मानाची शाल; गरीबाचा मुलगा होणार डॉक्टर

Dhanur: Parents feeding Khushal Gosavi. Along with village women.
Dhanur: Parents feeding Khushal Gosavi. Along with village women.esakal

Dhule News : घरची परिस्थिती बेताची. वाटेल ते हालअपेष्टांचे काम करून शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द. डॉक्टर व्हायच स्वप्न मनी ठेवून अभ्यास अन सुटीत गावातीलच एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करणारा खुशाल गोसावीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

त्याने एमएचटी सीईटीसह नीटमध्येही घवघवीत यश मिळविले आहे. सारे गाव खुशालचा सत्कार करीत आहे. खुशालवर सत्कार सन्मानाची शाल बघून आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत आहेत. (Khushal Inspired by family poor man son will become a doctor Success in NEET with MHT CET Dhule News)

खुशाल गोसावीने एमएचटी सीईटी परीक्षेत ९९.६७ पर्सेंटाईल मिळविले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आव्हानात्मक समजली जाणाऱ्या नीट परीक्षेत ४९२ गुण पटकाविले आहेत. खुशालवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खुशाल गोसावीचा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शांतूभाई पटेल, डॉ. गणेश पाटील, माजी उपसरपंच युवराज चौधरी, रमेश चौधरी, जगन्नाथ पाटकरी, माधव सैंदाणे, संजय पाटील, लक्ष्मण चौधरी, आधार चौधरी, चेतन पाटील, भटू माळी, दत्ता पाटील, संदीप पाटील, गणेश पाटील, मालूबाई शिंदे, सुनंदाबाई शिंदे, शोभाबाई चौधरी, ललिताबाई गोसावी आदींकडून सत्कार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhanur: Parents feeding Khushal Gosavi. Along with village women.
Dhule Market Committee : बाजार समितीत आता पोलिस गस्त; शेतमालाची चोरी रोखण्यासाठी बैठकीत निर्णय

ना कोटा ना खासगी क्लासचा ओटा

खुशाल गोसावीचे वडील छोटूगीर गोसावी व आई अलकाबाई गोसावी मोलमजुरी करतात. त्यांची कोटा, नांदेड व लातूरला क्लास लावण्याएवढी लाखावर परिस्थिती नाही. स्थानिक क्लाससाठी पैशांची तजवीज नाही.

खुशालने गरीबी डोळ्यासमोर ठेवून अभ्यास सुरु ठेवला. अन यश मिळविले. त्याने खासगी दवाखान्यात तीन वर्षे कंपाउंडर म्हणून काम करीत शिक्षणासह आई-वडिलांना हातभार लावला आहे. त्याच्या गुणवत्तेचे साऱ्या गावालाच अप्रूप वाटत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhanur: Parents feeding Khushal Gosavi. Along with village women.
Dhule News : साडेआठशे हरकतदारांची सुनावणीला दांडी; 19 जूनपासून पुन्हा सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com