किडनी दानातून मातेचे पोटच्या लेकीला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

धुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे दिलासा मिळाला. येथील जयहिंद कॉलनी परिसरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. योजनेसह हे हॉस्पिटल सोनवणे परिवारासाठी ‘विघ्नहर्ता’ ठरले.  

मजुरी करणारे सोनवणे यांना कन्येला (वय २६) किडनीचा आजार जडल्याने चिंता वाटू लागली. तिला डायलिसिस सुरू झाले. त्यांनी आर्थिक अडचणीमुळे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचे या हॉस्पिटलने सांगितल्यावर सोनवणे परिवाराला मोठा दिलासा मिळाला. या योजनेतून शस्त्रक्रियेसाठी किमान दीड लाख आणि पुढील औषधोपचारासाठी किमान एक लाखाचा निधी मिळाला. 

धुळ्यात सुविधा उपलब्ध
या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत खानदेशात ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचा दावा करत या हॉस्पिटलमधील किडनी विकारतज्ज्ञ डॉ. विकास राजपूत म्हणाले, की मुंबई, पुणे, नाशिकऐवजी जिल्ह्यातील व लगतच्या अन्य जिल्ह्यांतील रुग्णांना विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मदतीने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हॉस्पिटलमध्ये २०१६ मध्ये डॉ. यतीन वाघ यांनी हृदयाच्या आजारावरील पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. नंतर शंभराहून अधिक या शस्त्रक्रिया झाल्या. 

७० वर्षांनी शस्त्रक्रिया
हॉस्पिटलमध्ये २३ डिसेंबर २०१८ ला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. देशात पहिल्या अशा शस्त्रक्रियेनंतर ७० वर्षांनी ही शस्त्रक्रिया धुळ्यात पार पडली. याकामी मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. आशिष छाजेड, हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. यतीन वाघ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राहुल भामरे, भूलतज्ज्ञ डॉ. समीर शिंदे, डॉ. गुंजन पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. महेंद्र गिरासे यांचे सहकार्य लाभले. श्री. सोनवणे यांनी मनोगत व्यक्‍त केले. तज्ज्ञांमार्फत किडनी, मेंदू, अस्थी, हृदय, मधुमेह, पोटाच्या विकारावर उपचार करताना प्लास्टिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये असल्याचे डॉ. राजपूत म्हणाले.

Web Title: Kidnate Donate to Daughter Life Saving Motivation