'किकवारी खुर्द' आता झाले 'स्मार्ट व्हिलेज'

nashik
nashik

तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे. तसेच गावाने जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करुन म. फुले जल व भुमी संधारण अभियाचा प्रथम पुरस्कार मिळवला आहे. आमच्या गावात आमचे सरकार, पंचायतराज पुरस्कार, जलस्वराज्य प्रकल्प राबवुन गावाने आदर्श जपला आहे.

आदर्श गावाचे प्रणेते केदा बापू काकुळते यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने गावात सामुदायिक मंगल कार्यालय, व वृक्षलागवड करुन पक्ष्यांचे गाव म्हणुन व गार्डन गाव म्हणुन ओळखले जात आहे.

मात्र एवढ्यावर न थांबता स्मार्ट व्हिलेज योजनेत 'सहभागी होऊन स्मार्ट व्हिलेज परिक्षण समितीच्या सदस्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी १०० गुणांत गुणांकण करुन किकवारी खुर्दची निवड केली मात्र आचारसंहितेमुळे व गोपनीयतेमुळे जिल्हा स्मार्ट व्हिलेजची विजेत्या ग्रामपंचायंतीची नावे घोषीत केली नव्हती मात्र नुकतीच ही नावे जाहीर करुन जिल्ह्यात किकवारी खुर्द (ता. बागलाण) व माळेगाव (ता. सिन्नर) यांना प्रत्येकी २५ लाख रुपये बक्षिस लवकरच बक्षिस वितरण कार्यक्रम घेऊन देण्याचे घोषीत केले आहे.

विभागातुन नाशिक, अ. नगर, जळगाव या जिल्ह्यातुन विभागुन दोन ग्रामपंचायतींची तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातुन प्रत्येकी एक ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

स्मार्ट व्हिलेजचे परिक्षण झाल्यानंतर जिल्ह्याच्या बक्षिसास आपण १००% पाञ असु असा आशावाद असुनही एवढ्यावर न थांबता लोकवर्गणी व लोकसहभागातुन अनेक नालाबांध करुन जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केलीत व ते नालाबांध पहिल्याच पावसात भरल्याने गावकऱ्यामध्ये समाधान आहे. व जिल्ह्याच्या स्मार्ट व्हिलेजच्या मिळणाऱ्या बक्षिसांची रक्कम गावाच्या विकासासाठी व गावाच्या सौंदर्यात भर कशी पडेल यासाठी सुञबध्द नियोजन करुन गाव अधिक 'स्मार्ट' करण्याचा प्रयत्न राहिल.

गावातील प्रत्येक नागरिकाने गावाची स्वच्छता जपण्याचा सातत्यपुर्ण प्रयत्नामुळे हे यश मिळवु शकलोत, मात्र जिल्हास्तरिय स्मार्ट व्हिलेज योजनेच्या बक्षिसांच्या रकमेतुन गावचा अधिक विकास साधत, गावाच्या सौंदर्याची अधिक वृध्दी करण्याचा माझा मानस आहे.
केदा बापु काकुळते, सरपंच व प्रणेते आदर्श व स्मार्ट ग्राम, किकवारी खुर्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com