कोरेगाव भीमा प्रकरणात ऍड. शिशिर हिरे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मालेगाव - कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर राज्य शासन व पोलिस विभागाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून येथील ऍड. शिशिर हिरे यांची नेमणूक करण्यात आली. राज्याच्या गृहखात्याने ही नेमणूक केली आहे. हिरे यांनी यापूर्वी 2001 च्या मालेगाव येथील दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या के. एन. पाटील यांच्या मालेगाव दंगल चौकशी आयोगासमोर व 2013 च्या धुळे दंगल चौकशी आयोगासमोर मांडली होती. ऍड. हिरे यांचा अनुभव लक्षात घेता राज्य शासनाने पोलिस खात्याच्या विनंतीवरून हिरे यांची नेमणूक केली. ऍड. हिरे शासनाच्या विविध महत्त्वाच्या खटल्यांत विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. पोलिसांची बाजू समर्थपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.
Web Title: koregaon bhima case inquiry shishir hire