'कृष्णापुरीची पाटचारी ठरतेय 'शोपीस'

दीपक कच्छवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णापुरी धरणाच्या पाटचारीची दुरावस्था झाली आहे. धरण झाल्यापासुन अद्यापही पाटचारीची दुरूस्ती झालेली नाही. पाटचारीत गवत झुडपे वाढली आहेत. तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाली आहे. तात्काळ पाटचारीची दुरूस्ती करण्यात यावी आशी मागणी होत आहे.

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) तांड्याजवळ असलेल्या कृष्णापुरी धरणाचे काम 1997 व 98 मध्ये पुर्ण झालेले होते. या धरणातून एक पाटचारी देखील गेली आहे. या पाटचारीची सध्या दुरावस्था झाली आहे. पाटचारीत मोठमोठी झाडे झुडपे वाढलेली आहेत. यामुळे  ही पाटचारी आता दिसेनाशी झाली आहे. काही ठीकाणी तर पाटचारी आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. आता ही पाटचारी दुरुस्तीला पाटबंधारे विभागाला मुहुर्त कधी सापडणार असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या 20 वर्षापासून या पाटचारीची दुरूस्ती करीता पाटबंधारे विभागाने ठोस पावले उचलले नाही.

दुरूस्ती होणार कधी?
 कृष्णापुरी धरणाची पाटचारीचे क्षेत्र 47 हेक्टरचे आहे. ही चारी दुरूस्ती करण्यासाठी आजपर्यंत पाटबंधारे विभागाने दखल घेतलेली नाही. कृष्णापुरी धरणाची पाटचारी ही 'शोपीस' ठरल्याचे चित्र दिसत आहे.काही ठिकाणी ही पाटचारी  जमीनदोस्त झालेली आहे. या पाटचारी मध्ये असलेली काटेरी झुडपे तोडुन खोलीकरण करावे आशी मागणी होत आहे.

'धरणातून पाणी गळती'
कृष्णापुरी धरणाचा दरवाजाचा  लोखंडी पत्रा खराब झाला आहे.पावसाळ्यात  धरण शंभर टक्के भरल्यावर या दरवाजातून मोठ्या प्रमाणावर गळती होते. या लोखंडी दरवाजाची दुरूस्ती करून पावसाळ्यात होणारी पाण्याची गळती थांबवावी, आशी मागणी होत आहे.

Web Title: krishnapuri patchari showpiece