Vidhan Sabha 2019 : कुणाल पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

धुळे : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीत एक लाख दहा हजाराहून अधिक विक्रमी मतांनी विजयी झालेले काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शक्ती प्रदर्शनातून मिरवणूक काढली आहे.

येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रांगणातून मिरवणुकीस सुरवात झाली आहे. वडिल माजी कृषी मंत्री रोहिदास पाटील, विनय रोहिदास पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघात 35 वर्षे  रोहिदास पाटील यांचा एकछत्री अमल राहिला. मात्र, त्यांची विजयाची परंपरा 2009 ला शिवसेनेने खंडीत केली. लाखाच्या मतांनी शिवसेनेने विजय मिळविला होता.

याचे शल्य असलेल्या कुणाल पाटील यांनी 2014 मध्ये या पराभवाचा एक लाख दहा हजाराहून अधिक मते मिळवून वचपा काढला. शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. शिवाय मोदी लाट निष्प्रभ करत कुणाल पाटील यांनी विजय मिळविला. तोच कित्ता जनतेच्या पाठबळावर पुन्हा गिरवू, असा दावा आमदार पाटील यांनी मिरवणुकीवेळी बोलताना केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Patil filed his nomination form