खामगावात रक्ताचा तुटवडा; सामाजिक कार्यकर्त्यांचा रक्तदानासाठी पुढाकार 

Lack of blood bank in Khamgawa Social workers initiative for blood donation
Lack of blood bank in Khamgawa Social workers initiative for blood donation

खामगाव : येथील सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने वैद्यकीय अधिकारी व रुग्ण कल्याण समितीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळत अजून आज आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, पोलिस आणि पत्रकार बांधवांनी रक्तदान केले.

खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उन्हाळ्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी नीलेश टापरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा यांनी केले होते. दरम्यान आज पत्रकार श्रीधर ढगे, प्रदिप सनान्से, पोलीस कर्मचारी नितीन भालेराव आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुनंदा अजय डवरे, अविनाश भोकरे, अनिकेत संख्ये, श्रीकांत खडसे, श्रीकांत वानखडे, अजय डवरे, शरद पुरोहित, रत्नमाला गोलाईत, बंडू पजई, शेखर पाटील, सुमित बुधवानी, हितेश बोहरा, धर्मेश नागराणी, प्रशांत पाटील, मनोहर कोल्हे, किशोर महाले यांनी रक्तदान केले. सामाजिक कार्यकर्ते, संघटनानी रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी वैद्यकीय डॉ. अधिकारी निलेश टापरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com