महिलांनी तहसिलदारांना आंबा भेट देत केला भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

येवला : माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले की अपत्यप्राप्ती होते असे बेताल व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्य वक्तव्याचा येवल्यात स्वाभिानी रिपब्लीकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने तहसिलदारांना आंबे भेट देवुन निषेध नोंदवण्यात आला. स्त्री जातीची खिल्ली उडवुन अपमान केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे.   

रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. या सभेत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८० हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला.मात्र याविषयी आता जोरदार संताप व्यक्त होत आहे.आंबे खाऊन मुले होतात असा दावा करणे हे जादुटोना विरोधी कायद्यान्वे गुन्हा आहे.नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा पण भिडेंचे हे वक्तव्य पाहता त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचे दिसते तसेच या देशात मनस्मृती लागू करण्याचे काम ते करत आहेत.गुरुजी आपल्याला कुठल्या युगात नेऊ इच्छितात असा सवाल करून संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत पोलीसांनी याची दखल घ्यायला हवी. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे.

या वक्तव्याने भिडे यांनी स्त्री जातीची खिल्ली उडवुन अपमान केला असून अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवुन त्यांच्या सभांवर बंदी घालण्याची यावी व भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.या मागणीचे निवेदन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना आंब्यासह देण्यात आले.निवेदनावर तालुकाध्याक्ष महेंद्र पगारे, रेखा साबळे, रंजना पठारे, आशा आहेर, ज्योती पगारे, शोभा घोडेराव, वाल्हुबाई जगताप, कांताबाई गरुड, विजय घोडेराव, आकाश घोडेराव, शशिकांत जगताप, बाळासाहेब आहिरे, बाळासाहेब गायकवाड, सुनिल झाल्टे, विजय गायकवाड, तुळशिराम जगताप, दादासाहेब मोरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: ladies protest of sentence by sambhaji bhide and gifted mangoes to tehsil officers