नांदुरी सप्तशृंगी गड घाटात कोसळली दरड

दिगंबर पाटोळे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आज सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान नांदुरी - सप्तशृंगी गड  घाटातील गणेश टप्प्याजवळील भागात रस्त्यात दरड पडल्याची घटना घडली आहे.

वणी : सप्तशृंगी गडावर गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेल्या सतंतधार पावसामूळे नांदुरी - सप्तशृंगी गड घाट रस्त्यात छोटे मोठे दरड पडण्याच्या घटना घडत असून आज सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान घाटातील गणेश टप्प्याजवळील भागात रस्त्यात दरड पडल्याची घटना घडली आहे. 

आज सकाळी सुयोग गुरुबक्सानी फीनीक्युलर रोपवेचे कर्मचारी गणेश शेलार, (रा. वणी) हे दुचाकीवरून गडावर कामावर जात असतांना गणेश टप्प्याच्या पुढे त्यांना रस्त्याच्या मधोमध मोठ्या दरडासह छोटे आकाराचे दरड व साबराची झाडे पडलेली दिसली.

यावेळी त्यांनी रस्त्यातील पडलेले साबर आणि छोटे दगड हटवली. गडावर पोहचल्यानंतर रोपवे आयपीएफ सुरक्षा रक्षकांना घटनेची माहीती देत रस्त्यावरील दरड हटविण्याबाबत सांगितले. यावेळी रोपवेचे सुरुक्षा रक्षक  हिरामण गांगुर्ड, राजु राउत, धनराज बोरसे, संजय चव्हाण, विष्णु चव्हाण, एकलाख भाई यांनी रस्त्यावरील दरड हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide occurs at Nanduri Saptashringi ghat