वाड्मयाची भाषा ही समाजाला एकसंघ करण्याचे काम करते : डॉ. धोंडगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

वणी (नाशिक)  :  भाषा ही फार सुंदर गोष्ट मानवाला प्राप्त झालेली असून भाषेमुळेच समाज निर्माण झाला आहे. समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम भाषा आणि पर्यायाने वाड्मय करत असल्याचे प्रतिपादन मराठीचे जेष्ठ समीक्षक व भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. 

वणी (नाशिक)  :  भाषा ही फार सुंदर गोष्ट मानवाला प्राप्त झालेली असून भाषेमुळेच समाज निर्माण झाला आहे. समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम भाषा आणि पर्यायाने वाड्मय करत असल्याचे प्रतिपादन मराठीचे जेष्ठ समीक्षक व भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. 

वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. बच्छाव होते. शाळा महाविद्यालयांपेक्षा माणूस बिन भिंतीच्या समाज नावच्या शाळेतच भाषेचे उपयोजन कसे करायचे हे शिकत असतो. वाड्मयाची भाषा ही आपली भाषा असते. त्यामुळे ती सहज आपल्या काळजापर्यंत पोहचत असते. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतांनाही आपल्या पूर्वजांनी मौखिक भाषेच्या रूपाने प्रचंड लोकसाहित्य निर्माण करून ठेवले आहे. हे सर्व वाड्मय, लोक वाड्मय डोक्याचा विस्तार वाढविण्याचे काम करीत असल्याचेही डॉ. दिलीप धोंडगे यांनी सांगुन वाड्मय माणसाला जगण्याचे भान देत असते. जीवनात जगायचे कसे हे शिकवत असते. आपण स्वःताला कधीच कमी लेखू नये हे सांगताना त्यांनी संत तुकारामांच्या 'संकोचूनी काय झालासी लहान, घेई आषोषण ब्रम्हांडाचे' यासारखे अनेक दाखले देऊन डॉ. धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

मराठी विभागप्रमुख डॉ. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात वाड्मय मंडळाची भूमिका आणि उद्धिष्टे विशद केली. प्राचार्य डॉ. डी. आर. बच्छाव यांनी आपल्या मनोगतात वाड्मय मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके, डॉ. आर. डी. घोलप, डॉ. पी. एस. कुदनर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कैलास सलादे यांनी तर आभार सरस्वती जाधव हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. आर.टी. अहीरे, प्रा. एस. बी. लोखंडे, डॉ. व्ही. बी. बोरस्ते, 
संधान, प्रा. यू. बी. देशमुख, प्रा. पी. एम. कांबळे, प्रा. एल. एल. पाटील, श्रीमती एस. के. शेळके, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने विशेष प्रयत्न केले.

Web Title: language of literature to works to unite the community: Dr. Dhondge